Amazon Ad

दिलजमाई...! अन् विजयराज शिंदेंनी दिल्ली गाठून दिल्या ना.प्रतापराव जाधवांना शुभेच्छा! जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेला उधाण...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीत मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला. विशेष म्हणजे यावेळी बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे हे देखील उपस्थित होते. विजयराज शिंदे यांनी ना.जाधव यांना शुभेच्छा दिल्या. यामुळे आता विजयराज शिंदे आणि प्रतापराव जाधव यांच्यात चांगलीच दिलजमाई झाल्याची चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
  ना.जाधव आणि विजयराज शिंदे यांच्यात २०१४ पासून काही आलबेल नव्हते. आ. संजय गायवाड यांचे राजकीय प्रमोशन खा.जाधव यांनीच केल्याने विजयराज शिंदे दुखावले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी खा.जाधव यांनी विजयराज शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली, आणि प्रचारात सहभागी घेण्याची विनंती केली. विजयराज शिंदे यांनीही खा.जाधव यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याचे दिसले. दरम्यान ना.जाधव यांनी आज मंत्री पदाचा पदभार स्वीकारला. आयुष भवनात पदभार स्वीकारतेवेळी विजयराज शिंदे देखील उपस्थित होते. तुमच्या हातून देशाची, बुलडाण्याची सेवा घडो अशा शुभेच्छा यावेळी विजयराज शिंदे यांनी ना.जाधव यांना दिल्या..
दिलजमाई काहींसाठी अडचणीची...
दरम्यान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि विजयराज शिंदे यांची जवळीक काही नेत्यांसाठी अडचणीची ठरू शकते अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू शकते.