संग्रामपूरमध्ये उद्या आरोग्य तपासणी शिबीर! राजर्षी शाहू मल्टिस्टेट, वन बुलढाणा मिशन आणि जळगाव खानदेशच्या गोदावरी फाऊंडेशनचा उपक्रम

 

संग्रामपूर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राजर्षी शाहू मल्टिस्टेट, वन बुलढाणा मिशन आणि गोदावरी फाऊंडेशनच्या (जळगाव खानदेश) संयुक्त विद्यमाने ८ जून रोजी संग्रामपूर येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टर्स तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत. रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीपदादा शेळके यांनी केले आहे. 

संग्रामपूर येथील आशिष जनरल स्टोअर्समोरील पांडुरंग इंगळे यांच्या जागेत सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर चालणार आहे. यामध्ये कर्करोग विभाग, बालरोग शस्त्रक्रिया, मेंदु-मणका फॅक्चर, हृदयरोग, नेत्रालय, गर्भपिशवी,
नाक-कान-घसा शस्त्रक्रिया, अस्थिरोग, जनरल मेडीसीन, मानसोपचार यासह इतर आजारांवरील तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.