आमदार संजय गायकवाडांनी सांगितली मुख्यमंत्र्यांच्या बुलडाणा दौऱ्याची नवी तारीख! आता "या" दिवशी बुलडाण्यात...

 
Shinde
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "शासन आपल्या दारी" या कार्यक्रमाची प्रशासकीय तयारी सुरू आहे. मात्र या कार्यक्रमाला नेमका मुहूर्त काही मिळाला नाही. याआधी ४ तारखा ठरवण्यात आल्या, विविध कारणांमुळे त्या बदलण्यात आल्या. आधी लोणार, नंतर मेहकर आणि आता बुलडाण्याचे  स्थान त्यासाठी निश्चीत करण्यात आले आहे. आज,२९ ऑगस्ट ची तारीख या कार्यक्रमासाठी निश्चीत करण्यात आली होती मात्र आता पुन्हा तारीख बदलण्यात आली आहे.

"तारीख पे तारीख" अशीच या कार्यक्रमाची दशा सुरू आहे. २५ हजार लाभार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहतील असा दावा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. आता हा कार्यक्रम ३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचे आ.संजय गायकवाड यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

 कार्यक्रमाच्या नियोजनाची तयारी पूर्ण झाली आहे. परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेमागील जागेत हा कार्यक्रम होणार आहे. याठिकाणी रोजगार मेळावा, आरोग्य शिबिरासह विविध विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. लाभार्थ्यांना आणण्यासाठी ३५० बसेस बुक करण्यात आल्या आहेत.