दगडाच्या काळजाचे पालकमंत्री! ते आले त्यांनी पाहिलं अन् ते गेले; २५ मृतकांच्या नातेवाईकांचा आक्रोश त्यांच्या हृदयाला पाझर फोडू शकला नाही! अंत्यविधीला राहिले गैरहजर!

 मंत्री कसा असावा अन् कसा नसावा  लोकांनी सगळ अनुभवलं...
 
ghj

बुलडाणा(कृष्णा सपकाळ: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  १ जुलैच्या पहाटे समृध्दीवर खाजगी  बसचा अपघात झाला, २५ प्रवाशांचा कोळसा झाला. कोणता मृतदेह कुणाचा कळत नव्हत, नातेवाईकांचा आक्रोश, किंकाळ्या एवढ्या की त्या दगडालाही पाझर फोडतील...मात्र त्या किंकाळ्या, तो वेदनादायी आक्रोश जिल्ह्याच्या सन्माननीय पालकमंत्र्यांच्या काळजाला पाझर फोडू शकला नाही.. दगडाच्याच काळजाचेच असावेत ते..कारण तिथली दृश्य पाहून तर सामान्य माणसाच्या काळजाचं पाणी पाणी होत होत..खर तर अशा संकटाच्या वेळी पालकमंत्र्यांच्या पालकत्वाची कसोटी लागत असते..या भीषण अपघातानंतर प्रशासनासमोर अनेक प्रश्न होते,या प्रश्नांचे उत्तर पालकमंत्र्यांनी सोडवणे अपेक्षित होते. प्रशासनाला दिशानिर्देश देणे, मृतांच्या नातेवाईकांशी समजूत काढणे अशी अनेक कामे होती. पण मंत्री गिरीश महाजनांना ती भूमिका निभवावी लागली. या सगळ्या घडामोडीत खरे पालकमंत्री गुलाबराव पाटील केवळ जिल्ह्यात फेरफटका मारण्यासाठी आले की काय असेच वाटले, ते आले त्यांनी पाहिलं अन् ते गेले असाच पालकमंत्री गुलाबराव पाटलांचा दौरा होता..! 

 पालकमंत्री झाल्यापासून नामदार गुलाबराव पाटील तसेही फारसे जिल्ह्यात फिरकले नाहीत. अतिवृष्टी झाली तरी गायब, जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दुबार पेरणीचे संकट तरी गायब असच त्यांचं एकंदरीत धोरण राहिलय. जिल्ह्याबद्दल जेव्हढा जिव्हाळा निर्माण व्हायला पाहिजे तेवढा त्यांचा काही झालाच नाही.. मात्र समृध्दीवर झालेली घटना दुःखाचा कळस होती..२५ मृतदेहांची ओळख पटवण, मृतकांच्या नातेवाईकांशी मंत्री या नात्याने चर्चा करून अंतिम संस्कार कसे करायचे यावर तोडगा काढन अशी जिकरीची कामे होती, मात्र या कामाचं गांभीर्य त्यांना का जाणवलं नाही त्यांनाच ठाऊक.! सकाळी उशिरा आले अन् दुपारी ते लवकर निघून गेले..अशी कोणती महत्वाची काम त्यांच्या माग होती? अशी कुजबुज जिल्हा रुग्णालय परिसरात घटनेच्या दिवशी उपस्थित असलेल्या लोकांमध्ये होती. बरं एवढं झाल्यावर दुसऱ्या दिवशी किमान सामूहिक अंत्यविधीला उपस्थित राहण्याचेही त्यांना सुचले नाही.
  
संवेदनाशीलता असावी ती अशी..!

ffj

एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आपल्या असंवेदनशीलतेचा परिचय देत असताना त्यांचेच मंत्रिमंडळातील सहकारी मंत्री गिरीश महाजन मात्र संवेदनशीलता कशी असावी याचे कृतिशील उदाहरण घालून देत होते. अपघातस्थळी सर्वात आधी पोहणारे मंत्री गिरीश महाजनच होते. अंत्यसंस्कार पार पडेपर्यंत ते बुलडाण्यात तळ ठोकून होते. १ जुलैच्या रात्री अडीच पर्यंत जिल्हा रुग्णालयात असलेले गिरीश महाजन २ जुलैच्या सकाळी ५ वाजता पुन्हा जिल्हा रुग्णालयात हजर होते. अंत्यसंस्काराच्या वेळी जिल्ह्यातील इतर नेते सावलीचा आधार घेऊन बसलेले होते तेव्हा गिरीश महाजन सरण रचत होते, स्वतःच्या हातांनी काळेकुट्ट झालेले मृतदेह सरणावर ठेवत होते. केवळ आमदार श्वेताताई, आमदार संजय गायकवाड आणि रविकांत तुपकर हीच नेतेमंडळी महाजनांना या कामात मदत करतांना दिसली. सामूहिक  अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांना राजी करण्यापासून तर मृतकांच्या नातेवाईकांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था यात ते स्वतः लक्ष घालून होते. अंत्यविधी विधिवत झाले पाहिजे यासाठीही त्यांनीं प्रशासनाला आवश्यक त्या सूचना दिल्या..केवळ सूचना अन्  आदेश नव्हे तर प्रत्यक्ष काम करीत होते. २५ पैकी २५ मृतकांच्या कुटुंबीयांची मंत्री गिरीश महाजनांनी भेट घेतली..मंत्री असावा तर "असा" असे शब्द अनेकांच्या तोंडून निघतांना दिसले अन् मंत्री नसावा दगडाच्या काळजाचा असेही बरेच जण बोलतांना दिसले..!