पालकमंत्री गुलाबराव पाटील बेपत्ता! शोधून आणणाऱ्यास ५१ रुपयांचे बक्षीस; चर्चा तर होणारच..

 
पोस्टर
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पालकमंत्री झाल्यापासून गुलाबराव पाटलांना जिल्ह्यात पाय ठेवायला वेळ मिळाला नाही. सोयाबीन हंगामात अतिवृष्टी झाली,शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले मात्र गुलाबराव पाटील शेतकऱ्यांचे दुःख जाणून घ्यायला आले नाही. आताही महिभरात अनेकदा अवकाळी पावसाने जिल्ह्यात झोडपले, मोठी जीवितहानी आणि वित्तहानी झाली मात्र तरीही पालकमंत्री गायब आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आगळ्या वेगळ्या पद्धतीने पालकमंत्र्यांचा निषेध केलाय. 
 

 स्वाभिमानीचे नेते प्रशांत डिक्कर यांनी पालकमंत्री बेपत्ता असल्याचे पोस्टर लावले आहेत. पालकमंत्र्यांना शोधून देणाऱ्यास ५१ रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. कवठळ येथील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय व गावागावांतील भिंतींवर हे पोस्टर लावण्यात आले आहे. स्वाभिमानीच्या या लक्षवेधी आंदोलनाची चर्चा तर होणारच ना ..