रविवारी बुलडाण्यात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार! १ लाख ५ हजार लाभार्थ्यांना मिळणार लाभ!

खासदार जाधव, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला कार्यक्रमाच्या आयोजनाचा आढावा

 
Hshsh
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचा ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम रविवार, दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 12.30 वाजता मलकापूर रस्त्यावरील कऱ्हाडे ले आऊट, परिवहन महामंडळाच्या कार्यशाळेमागील मैदानात होणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजनाचा खासदार प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला.
यावेळी आमदार संजय रायमुलकर, संजय गायकवाड यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील विंचनकर, निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मेहकरचे उपविभागीय अधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी कार्यक्रमास्थळी उभारण्यात आलेल्या स्टॉल, स्टेजची पाहणी केली. तसेच विविध विभागांना सोपविण्यात आलेल्या जबाबदारी योग्यरित्या पार पाडण्याचे आवाहन केले. खासदार प्रतापराव जाधव यांनी कार्यक्रमासाठी लाभार्थी येणार आहे. त्यामुळे नियोजनात कोणतीही उणीव राहू नये. तसेच कार्यक्रम सुरळीत सुरू होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. कार्यक्रमासाठी महिला मोठ्या प्रमाणावर येणार आहे. त्यांना आवश्यक असलेल्या सुविधा प्राधान्याने उभारण्यात याव्यात. तसेच लाभार्थींना घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी. लाभार्थी निवडताना स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात यावे. कार्यक्रमात 30 हजार लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ तर 75 हजार लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. आमदार संजय गायकवाड यांनी कार्यक्रमासाठी वाहनांसाठी पार्कींगची मुबलक व्यवस्था करण्यात यावी. तसेच लाभार्थ्यांची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.
सुरुवातीला श्री. गिते यांनी, कार्यक्रमस्थळी विविध विभागांना 50 स्टॉल उभारण्यात आले आहे. सदर स्टॉल ताब्यात घेऊन या ठिकाणी माहिती फलक लावण्यात यावे. तसेच स्टॉलसाठी संपर्क अधिकारी नेमण्यात यावा. तसेच कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांना आणण्यात येणार आहे. त्यानुषंगाने बसचा मार्ग ठरविण्यात यावा. तसेच लाभार्थ्यांच्या पाणी आणि जेवणाची व्यवस्था करण्यात यावी. लाभार्थ्यांना आणणे आणि नेण्यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे यांनी वाहनतळांची माहिती दिली.