गोर सेनेचा संदीप शेळकेंना जाहीर पाठिंबा! विभागीय अध्यक्षांनी दिले पाठिंब्याचे पत्र
Apr 11, 2024, 19:27 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या संदीप शेळकेंना भरघोस पाठिंबा मिळतो आहे. समाजातील विविध घटक, संघटना संदीप शेळके यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. आता गोर सेना देखील संदीप शेळके यांच्या पाठीशी उभी राहिली असून गोर सेनेने पाठिंब्याचे पत्र संदीप शेळके यांना दिले आहे.
गोर सीकवाडी पुरस्कृत गोर सेनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष रामचंद सरीचंद चव्हाण यांच्या स्वाक्षरीने हे पत्र देण्यात आले आहे. "संदीप शेळके लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असून त्याचा आम्हाला आनंद होत आहे. गेल्या २० वर्षात जिल्ह्याचा विकास होणे गरजेचे होते परंतु विकास तर झाला नाही, जिल्ह्यात बदल झाला नाही उलट मागासलेला जिल्हा म्हणून सध्या या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. ही ओळख पुसायची असायची असेल तर संदीप शेळके यांच्यासारखे सुशिक्षित खासदार जिल्ह्याला गरजेचे आहेत. त्याकरिता जिल्हाभरातून आपल्याला हत्तीच्या बळासारखे जनता साथ देत असून आम्ही सुद्धा गोरसेना बुलडाणा जिल्ह्याच्या वतीने आपल्याला जाहीर पाठिंबा देत आहोत."असे पत्रात नमूद आहे.