GOOD NEWS बोदवड उपसा सिंचनचा मार्ग मोकळा! खासदार प्रतापराव जाधवांच्या प्रयत्नांना यश! ५६३ कोटींचा निधी मिळणार! जिल्ह्यातल्या १३ हजार ७४३ हेक्टरवरील शेतीला फायदा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कायम दुष्काळाचा सामना करावा लागणारा मोताळा आणि मलकापूर तालुक्याची सिंचनाची समस्या कायमची सुटणार आहे. कारण बोदवड उपसा सिंचन योजनेअंतर्त शेतकऱ्यांना पाणी मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने योजनेला मूर्त रूप देण्याचा दृष्टीने मान्यता दिली आहे..
    Dhanik
                          जाहिरात 👆
खासदार प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भामध्ये वारंवार पाठपुरावा केला. तद्वतच लोकसभेमध्ये देखील हा विषय लावून धरला होता. मोताळा व मलकापूर तालुक्यासह परिसरातील शेतकऱ्यांसाठी बोदवड उपसा सिंचन योजना किती महत्त्वाची आहे, या संदर्भामध्ये केंद्र सरकारला जाणीव करून त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला. प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजनेअंतर्गत बोदवड उपसा सिंचन योजनेचा समावेश झाल्याने तब्बल ५३६ कोटी रुपयांचा निधी त्या अंतर्गत मिळणार असून खासदार प्रतापराव जाधव यांच्या मागणीमुळे शेतकऱ्यांचा हा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे. 
  केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीत तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या बोदवड परिसर सिंचन योजना टप्पा एकचा समावेश केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री कृषी सहाय्य योजना अंतर्गत वेगवर्धित सिंचन योजनेत करण्याला मान्यता प्राप्त झाली आहे. टप्पा एकची एकूण किंमत २१४१.४९कोटी रुपये असून त्या कामाप्रीत्यर्थ किंमत १९२३.८१ कोटी रुपये एवढी आहे. 
विदर्भातील ६१६७ हेक्टर व अवर्षण प्रवण भागातील ९५०७ तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील ६५४६हेक्टर अशा बुलढाणा जिल्ह्यातील १३७४३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा फायदा यातून मिळणार आहे. 
मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ५३६.६४ कोटी येत्या तीन वर्षात केंद्र शासनामार्फत प्राप्त होणार असून उर्वरित ५४३.३५ कोटी राज्य शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहेत.
बोदवड उपसा सिंचन योजनेचा मुख्य स्रोत हातनुर धरण आहे. कायम अवर्षणग्रस्त असणाऱ्या मोताळा व मलकापूर तालुक्यासाठी ही उपसा सिंचन योजना वरदान ठरणार आहे खासदार प्रतापराव जाधव यांनी कायमस्वरूपी या भागातील शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था व्हावी म्हणून केंद्र शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. संसदेच्या २०२२ च्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या मध्ये बोदवड उपसा सिंचन योजनेच्या संदर्भात Grants For Demands च्या अनुषंगाने आग्रही भूमिका देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी मांडली होती, हे येथे उल्लेखनीय.