मातृतीर्थ सिंदखेडराजा वासियांसाठी आनंदाची बातमी! ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय होणार आता १०० खाटांचे; आ.डॉ.राजेंद्र शिंगणेंचे प्रयत्न फळाला...

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) मातृतीर्थ सिंदखेडराजा वासियांची आनंदाची बातमी आहे. सिंदखेडराजा नगरीचे ग्रामीण रुग्णालय आता १०० खाटांचे होणार आहे. विशेष बाब म्हणून शासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा उंचावला गेला आहे.
घुबे
                       जाहिरात 👆
मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय १०० खाटांमध्ये केल्या जाईल. तसेच रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी व पदनिर्मितीसाठी स्वतंत्र कार्यवाही करण्यात येईल असे शासन निर्णयात म्हटले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून आ. डॉ.राजेंद्र शिंगणे यासाठी पाठपुरावा करत होते. या निर्णयाने त्यांच्या प्रयत्नाला फळ मिळाले आहे. तसेच संपूर्ण सिंदखेड राजा वासियांसाठी ही आनंदाची वार्ता आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारासाठी अधिक सुकर मार्ग झाला आहे.