बातमी मराठा समाज बांधवांसाठी! जात प्रमापत्रपत्र हवय? मग हे करा...
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन उभे करून सरकारला पळता भुई थोडी केली. अखेर सरकारला नमते घ्यावे लागले. सरकारला वाढीव वेळ देऊन मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतले.
रम्यान सरकारच्या निर्देशानुसार हे मराठवाड्याच्या धर्तीवर बुलडाणा जिल्ह्यातही कुणबी , मराठा - कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
निजामकालीन पुरावे, वंशावळी, तत्कालीन स्थानिकांनी दिलेल्या सनदी, महसुली व शैक्षणिक पुरावे, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहे. पडताळणी झाल्यावर पात्र व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यातील ६ एसडीओ व १३ तहसीलदारांना हे निर्देश देण्यात आले आहेत. कुणबी - मराठा, मराठा - कुणबी अथवा कुणबी याबाबतचे १९६७ च्या आधीचे पुरावे उपलब्ध असणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांनी आपापल्या उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदारांकडे अर्ज सादर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.