चिखलीकरांसाठी GOOD NEWS! शहरात विकासगंगा; आमदार श्वेताताईंच्या हस्ते आज तब्बल २६ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन! वाचा ,शहरात कुठे काय होणार...

 
mahale
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी मतदारसंघात सध्या विकासकामांचा झपाटा लावलाय. मतदारसंघातील ग्रामीण भागासह चिखली शहरात विकासकामे करण्यात येत आहेत. आज,१५ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर चिखली शहरात तब्बल २६ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आलाय. आमदार श्वेताताई महालेंच्या अथक प्रयत्नांतून मंजूर झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिशजी गुप्त राहणार आहे.

   mahale

सकाळी १० वाजता  चिखली शहरातील जाफ्राराबाद रोड ते बोधेकर ले आऊट व पुढे नगर परिषद हद्दीपर्यंत रस्ता काँक्रेटिंग, नालीचे बांधकाम व पेव्हर ब्लॉक पदपथ करणे असा ५ कोटी ५६ लाख ६१ हजार ३०६ रुपयांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर  ११ वाजता  चिखली शहर सर्व्हे नंबर १२३,१२४ लद्धा लेआउट पासून ते सावजी कॉम्प्लेक्स पर्यंत रस्ता कॉंक्रिटिंग, तू तर नाली चे बांधकाम असा २ कोटी ८४ लाख ३३ हजार ९२ रुपयांच्या कामाचा  भूमिपूजन सोहळा संपन्न  होईल.

    सायंकाळी ५ वाजता चिखली शहर भगवती स्वीट मार्टपासून ते वायाळ कॉम्प्लेक्स पर्यंत (बस स्थानकाच्या दक्षिण बाजूचा रस्ता) रस्ता काँक्रीटिंग, दुतर्फा नालीचे बांधकाम करणे असा ३ कोटी ३५लाख ६८ हजार २७२ रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होईल. सायंकाळी ६ ला चिखली शहर महाजन लेआउट बी. डी. सी.सी बँक च्या मागील बाजूपासून ते जुना शेलुद रोड पर्यंत रस्ता काँक्रेटिंग, दुतर्फा नालीचे बांधकाम  असा ३ कोटी ३८ लाख ७७ हजार २५० रूपयांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा तर सायंकाळी ७ ला चिखली शहर सरस्वती नगर पासून ते सं. नं ९०( जुना शेलुद रोड) पर्यंत रस्ता काँक्रीटिंग, दुतर्फा रस्ता काँक्रीटिंग, दुतर्फा नालीचे बांधकाम असा  १० कोटी ४२ लाख २९ हजार ५५५ रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न होईल...!