बुलडाणेकरांसाठी GOOD NEWS ! आमदार संजय गायकवाडांनी आणली विकासाची गंगा! उद्या,शहरात १० कोटी २५ लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन! वाचा कसा आहे कार्यक्रम.....

 
Hdjcj

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी ही कामाची बातमी आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघांचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा धडाका लावलाय..याच विकास मालिकेचा एक भाग म्हणून उद्या बुलडाणा शहरात तब्बल १० कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. खा. प्रतापराव जाधव या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन होईल..

  Mla
                        जाहिरात 👆
बुलडाणा शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये भीमराव सावळे यांच्या घरापासून तर श्री. पैठणे यांच्या घरापर्यंत श्री गवई यांच्या घरापर्यंत रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणासह नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. तानाजी नगर येथे हनुमान मंदीर परिसरात विविध कामांचे भूमिपूजन होणार आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये जैस्वाल ले आऊट मधील राम मंदिराच्या मागील खुल्या भुखंडाला चेनलिंग फॅन्सीगसह संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळादेखील उद्या आयोजित करण्यात आला आहे. सर्वे क्रमांक १६ मधील अंतर्गतचे सिमेंट काँक्रीट रस्ते व नालीचे बांधकाम, श्री शिवाजी हायस्कूल परिसरात पेव्हर ब्लॉक बसवणे, कानडे शास्त्री शाळेच्या प्रांगणावर नवीन शाळेचे बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक १३ मधील श्री स्वामी समर्थ केंद्र सभागृहाचे बांधकाम करणे तसेच प्रभाग क्रमांक ८ मधील जय श्री राम बिल्डिंग समोरील नगरपालिकेचा भूखंड विकसित करणे आदी विकासकामांचा भव्य दिव्य सोहळा उद्या,८ जानेवारीला होणार आहे.