GOOD NEWS शेगाव रेल्वेस्थानकावरील विकासकामांसाठी केंद्राकडून २८.८८ कोटींचा निधी मंजूर! खा. प्रतापराव जाधवांच्या प्रयत्नांना यश; उद्यापासून कामाला सुरुवात; पंतप्रधान करणार भूमिपूजन

 
pj
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार यांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. खा. जाधव यांनी केंद्रिय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांची अनेकदा भेट घेऊन शेगाव रेल्वेस्थानकावरील प्रवाशांच्या सोयीसाठी पाठपुरावा केला होता. त्या कामांसाठी आता २८.८८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून उद्या,६ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे.
 

 केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन योजनेत खा.जाधव यांच्या प्रयत्नांमुळे शेगाव रेल्वे स्थानकाचाही समावेश झाला आहे. विदर्भ पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावात श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची सातत्याने रेलचेल असते. राज्यासह देशभरातून भाविक शेगावात येत असतात. त्यामुळे शेगाव रेल्वेस्टेशनवर सुविधांची नितांत गरज असल्याची बाब खा.प्रतापराव  जाधव यांनी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत शेगाव रेल्वे स्थानकावरील कामांसाठी २८.८८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 

 उद्या ६ ऑगस्टच्या सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने भूमिपूजन होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे देखील आभासी पद्धतीने कार्यक्रमाला हजेरी लावतील. रेल्वे प्रशासनाच्या वतीने या कार्यक्रमासाठी जय्यत करण्यात आली आहे. या निधीतून शेगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी मूलभूत सुविधांसह अत्याधुनिक दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येणार आहेत. "केंद्र सरकार विकास करणारे सरकार आहे, लोकसभा मतदारसंघात विविध विकासकामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. राज्य आणि केंद्राच्या मदतीने लोकसभा मतदारसंघात विकासाची घोडदौड सुरू आहे, आता ती थांबणार नाही" अशी प्रतिक्रिया खा. प्रतापराव जाधव यांनी दिली आहे.