GOOD NEWS! चिखली- बुलडाणा -मलकापूर रस्त्याचे चौपदरीकरण होणार! समृध्दी महामार्गालाही आणणार जवळ; आ. श्वेताताईंच्या पाठपुराव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी घेतली ॲक्शन! नेमकं काय होणार? वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय.. चिखली- बुलडाणा- मलकापूर या महत्त्वाच्या रस्त्याचे आता चौपदरीकरण होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून नागरिकांची ही मागणी होती. जिल्ह्याला जोडणाऱ्या रस्त्याचे चौपदरीकरण होणे आवश्यक होते. आता त्यादृष्टीने पावले उचलण्यात आली आहे. काल,८ ऑगस्टला चिखली विधानसभा मतदारसंघ सह जिल्ह्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. आ. श्वेताताईंच्या आग्रहास्तव झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत चिखली - बुलडाणा - मलकापूर रस्त्याच्या चौपदरीकरणावर चर्चा झाल्याचे आ. श्वेताताई महाले यांनी सांगितले.
मलकापूर - बुलडाणा - चिखली हा राष्ट्रीय महामार्ग ७५३ A घोषित आहे. सध्या हा मार्ग बुलडाणा अर्बनला BOT तत्वावर दिलेला आहे. आता बुलडाणा अर्बन ला काही रक्कम परतावा देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यामुळे या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने बैठकीत दिली. त्यावर तातडीने काम सुरू करा अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. 
समृध्दी महामार्गही आणणार जवळ...
मलकापूर - बुलडाणा आणि चिखली वासियांना मुंबईकडे जातांना समृद्धी महामार्गावरील पळसखेड इंटरचेंजवर जाण्यासाठी देऊळगाव राजा वरून सिंदखेडराजा असे जावे लागते. यासाठी २५ किलोमीटरचा फेरा पडतो. मार्गाऐवजी जवळखेड मार्गे असोला फाटा ते इंटरचेंज किंवा पळसखेड झाल्टा मार्गे असोला फाटा ते इंटरचेंज हे अंतर २५ किमी ने कमी होते. त्यामुळे हा प्रमुख जिल्हा मार्ग दर्जोन्नत करून रस्त्याची मजबुतीकरण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत. त्यामुळे मलकापूर, बुलडाणा, चिखलीवासियांसाठी आता समृध्दी महामार्ग २५ किमी जवळ येणार आहे.