चिखलीत विकासाची गंगा! आमदार श्वेताताईंच्या हस्ते १.२२ कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन! श्वेताताईंचा चिखलीकरांना शब्द; म्हणाल्या, समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध..

 
sm

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  जिल्ह्याची राजकीय राजधानी असलेल्या चिखली शहराला सर्वांगसुंदर आणि विकसित शहर बनवण्याचा मी संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी शहराचा समतोल विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. सर्व भागातील नागरिकांना आवश्यक असलेल्या सोयी, सुविधा उपलब्ध केल्या जातील असा शब्द आमदार श्वेताताई महाले यांनी चिखलीकरांना दिला.

 चिखली शहरातील शहरातील प्रभाग क्रमांक ३ मध्ये १ कोटी २२ लक्ष रुपये किमतीच्या विकासकामांचे भूमिपूजन आ. श्वेताताई महाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. आ. श्वेताताई महाले यांनी मंजूर करवून आणलेल्या विविध विकासकामांपैकी प्रभाग क्रमांक ३ मध्ये मारुती मंदिर ते अजीज शेख यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण व नाली बांधकाम (किंमत ८२ लक्ष रुपये), बीएसएनएल ऑफीस ते शारदा प्रोव्हिजनपर्यंत रस्ता काँक्रिटीकरण ( किंमत ४० लक्ष) या विकासकामांचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी डॉ. प्रतापसिंग राजपूत, रामदास देव्हडे, शिवाजीराव देशमुख, सलीम मेमन, पंडितराव देशमुख, सुरेंद्र पांडे, प्रा. वीरेंद्र वानखेडे, विलास घोलप, शेख अनिस, वजीराबी अनिस शेख, सुनीता भालेराव, सागर पुरोहित हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच सुभाष झगडे, नामू गुरुदासानी, अर्चना खबुतरे, अनुप महाजन, सुदर्शन खरात, गोविंद देव्हडे, शैलेश बाहेती, सचिन कोकाटे, युवराज भुसारी, महेश लोणकर, भारत दानवे, संतोष अग्रवाल, चेतन देशमुख, अक्षय भालेराव, विलास पडघान, सलीम परवेझ, सादिक काझी, सुभाष खरात, मधुकर खरात, वसीम, घनश्याम बंग, अक्रम बेग, संदीप लोखंडे, शैलेश सोनुने, राजदारखाँ उस्मानखाँ, शेख रब्बानी, शेख रउफ शेख बुढन, शेख कलीम शेख बुढन, शेख वाजीद शेख इद्रिस, शेख नाजिम ठेकेदार, शेख अकबर, शेख मजीद यांच्यासह भाजप, शिवसेना, रिपाई आठवले गट, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना, पीरिपा, प्रहार तसेच मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.