चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन परिहारांचा आमदार श्वेताताईंच्या नेतृत्वावर विश्वास! काँग्रेसला रामराम करीत मुंबईत उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

 
चिखली(गणेश धुंदाळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक गजानन परिहार यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला.
आमदार श्वेताताईंनी विकासाचा झंझावात सुरू केला आहे. मतदारसंघांचा कायापालट होत आहे. विकासकामे करतांना आमदार श्वेताताई जात- पात ,धर्म पंथ पक्ष असा कोणताही भेदभाव करीत नाहीत. मतदारसंघातील तळागाळातील व्यक्ती विकासाचा लाभार्थी झाला पाहिजे ही आमदार श्वेताताईंची तळमळ पाहून भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया गजानन परिहार यांनी व्यक्त केली.