राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या देऊळगावराजा तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी गजानन चित्ते यांच्यावर!
Nov 2, 2023, 10:01 IST
देऊळगावराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक शाखेच्या देऊळगावराजा तालुकाध्यक्ष पदी गजानन चित्ते यांची निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष पराग अवचार यांनी ही नियुक्ती केली. गजानन चित्ते अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कार्यरत आहेत, त्यांच्या आजपर्यंतच्या कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली.