माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर मुख्यमंत्र्यांना भेटले! सिंदखेडराजा मतदारसंघ दुष्काळग्रस्त घोषित करण्याची केली मागणी..

 
Hdbxb
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेसेवा): गेल्या महिनाभरापासून पावसाने दांडी मारल्या मूळे हजारो हेक्टर क्षेत्रातील खरीप हंगामातील पिके पावसा अभावी करपू लागली आहे. गत काही काळापासून शेतकरी कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करत दरवर्षी अपेक्षा ठेऊन संघर्ष करीत आहे. ऐन पीक बहरात असतानाच पावसाने उघड दिल्याने तोंडाशी आलेला घास गमविण्याची वेळ शेतकऱ्यांनावर आल्याने, तात्काळ शासनाने सर्व्हे करुन सिंदखेडराजा राजा मतदारसंघ दुष्काळ ग्रस्त घोषीत करावा, अशी मागणी सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे मा. आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.
ऑक्टोबर महिना मावळतीला लागलेला आहे. पावसाळ्याच्या ४ महिन्याचा कालावधी संपलेला आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरवली असून अनेक दिवसांपासून पावसाने दडी दिली आहे. खरीप हंगामात दमदार पावसाचे आगमन होऊ न शकल्याने सोयाबीन, मका व कपाशी, ज्वारी हे पिके करपून जात आहे. पावसाचा खंड वीस ते पंचवीस दिवसांपेक्षा जास्त असून सोयाबीन, ‍ , मका तसेच कापूस ही पिके पूर्णपणे करपली आहे. अशा परिस्थितीत पावसाअभावी वाढत्या तापमानाने पिके धोक्यात आले आहे. पावसाअभावी हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कपाशीचे पीक गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
सणासुदीच्या दिवसात शेती उत्पादनाच्या आधारावर केलेले नियोजन आता कोलमोडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची मोठी समस्या शेतकऱ्यांपुढे उभी राहिली असल्याची बाब खेडेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तसेच मतदार संघातील खडकपूर्णा धरणा सह अन्य छोटे मोठे प्रकल्प कोरडे ठनठणीत तर काही ठिकाणी जलसाठा नगण्य अवस्थेत पोहचल्याने अनेक गावात पिण्याच्या व जनावरांना पाण्यावर व परिसरातील सिंचन क्षेत्रावर विपरीत परिणाम जाणू लागला आहे. त्यामुळे सर्वत्र दुष्काळाचे गडद सावट कोसळलेले आहे.
दमदार पाऊस न पडल्यामुळे खडकपूर्णा धरणात व इतर सिंचन प्रकल्पात पाहिजे तेवढे पाणी जमा होऊ शकले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील सर्व पिके शेतकऱ्यांच्या हातची गेली आहे. अशा या भीषण परिस्थितीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित मतदार संघात करपत असलेल्या पिकांचा सर्व्हे करून मतदार संघ दुष्काळ ग्रस्त घोषित करावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.