माजी आमदार धृपदराव सावळेंना धक्का! चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भावाचा पराभव! महाविकास आघाडीची हवा..

 
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आज ३० एप्रिल रोजी संपन्न झाली.सध्या तालुका क्रीडा संकुल येथे मतमोजणी सुरू आहे. सध्या हाती येत असलेले निकाल भाजपसाठी धक्कादायक आहेत.

साडेआठच्या सुमारास हाती आलेल्या निकालात ९ जागा सध्या महाविकास आघाडीच्या ताब्यात गेल्या आहेत, तर एका जागेवर भाजपच्या सहकार परिवर्तन पॅनलचा विजय झाला आहे. बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धृपदराव सावळे यांच्यासाठी सुद्धा या निवडणुकीचा निकाल धक्कादायक आहे. धृपदराव सावळे यांचे बंधू राजू भगवान सावळे यांचा निवडणुकीत पराभव झाला आहे.

सहकारी सोसायटी मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे होते. अजून मतमोजणी सुरू असून उर्वरित जागांवर सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत.