माजी मंत्री,आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा वाढदिवस देऊळगावमहीत होणार हटक्या पद्धतीने साजरा! आरोग्य आणि नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन; चष्म्यांचेही होणार वाटप
देऊळगावमही ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सिंदखेड राजा विधानसभेचे विद्यमान आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त ३० मार्च रोजी देऊळगाव मही येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान देखील या शिबिरात होणार असून या शिबिरात औषधे व चष्मा वाटप करण्यात येणार आहे, या शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक गजानन चेके यांनी केले आहे.
ग्रामीण भागातील आरोग्य विषयक समस्या पाहता राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन चेके यांनी आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त देऊळगाव मही येथे ३० मार्च रोजी आरोग्य तपासणी शिबिराचेआयोजन केले आहे. या शिबिरात नेत्रतपासणी व मोतीबिंदू तपासणी तसेच इतर महागड्या तपासण्या देखील या शिबिरात केल्या जाणार आहेत. तसेच औषधी व चष्म्यांचे देखील वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, जालना येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप हुसे, डॉ. रामेश्वर वरकड यांच्यासह इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गजानन चेके यांनी केले आहे.