श्री संत सखाराम महाराज संस्थानच्या विकासासाठी खा. प्रतापराव जाधवांनी मिळवून दिला ५०लाखांचा निधी! ह.भ. प तुकाराम महाराजांनी दिले आशिर्वाद!

 
Khasdar
जळगाव जामोद(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जळगांव जामोद तालुक्यातील इलोरा सखारामपूर येथील श्री संत सखाराम महाराज संस्थानच्या विकासासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी पर्यटन विकास योजनेअंतर्गत ५० लाखांचा निधी मिळवून दिला. काल, २८ डिसेंबरला ह.भ.प.श्रीराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा ह.भ. प तुकाराम महाराज सखारामपुरकर यांच्या हस्ते संपन्न झाला. 
 प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत खा. प्रतापराव जाधव यांनी संस्थानला हा निधी मिळवून दिला. यावेळी गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर यांनी खा.जाधव यांना जणसेवे साठी आशीर्वाद दिले.माजी आमदार चैनसुख संचेती, शिवसेना जिल्हाप्रमुख शांताराम दाने,उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, राजू पाटील, अजय पारस्कर, केशव ढोकणे, संस्थानचे दादा पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.