खा.प्रतापराव जाधवांसाठी एकदिलाने, एकमनाने! जोमाने प्रचाराला भिडले युतीचे सहा शिलेदार; आमदारांसाठी ही निवडणूक विधानसभेची रंगीत तालीम; २०१९ मध्ये खा.जाधवांना असा मिळाला होता लीड...
आमदारांसाठी भावी विधानसभेची रंगीत तालीम ठरली आहे.महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या विजयासाठी युतीचे सहा आमदार एकदिलाने व ताकदीने प्रचाराला लागले आहे. सहाही आमदार 'अबकी बार चारसो पार' आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या जिद्दीने कामाला भिडल्याचे चित्र आहे.
सलग तीनदा खासदार झालेले प्रतापराव जाधव यांचा राजकारण व निवडणूक रणनीतीचा सखोल अभ्यास आहे. पंधरा वर्षातील विकासकामे, जनसंपर्क व सभागृहात शेतकरी सर्वसामान्य जनता, मतदारसंघाचा विकास, लागणारा निधी, देशहितासाठी त्यांनी लोकसभेत आवाज बुलंद केला आहे. युतीतील भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी( अजितदादा गट) यांच्यासह १५ घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अशी मोठी फौज त्यांच्यासाठी प्रचाराला लागली आहे. मतदारसंघातील सहाही आमदार महायुतीचे असणे ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. आमदार सर्वश्री राजेंद्र शिंगणे( राष्ट्रवादी) , संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले( भाजपा), संजय रायमूलकर , संजय गायकवाड( शिवसेना ) या सहा प्रबळ शिलेदारांनी आपापल्या विधानसभा मतदारसंघाची बाजू भक्कपणे सांभाळली आहे.
आमदारांसमक्ष आव्हान!
दुसरीकडे लोकसभेची निवडणूक या आमदारासाठी मजेदार आव्हान ठरली आहे. विधानसभा अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहे. सहाही आमदार महायुतीचे आहेत. यामुळे आपल्या कार्यक्षेत्रात उमेदवाराला मताधिक्य देण्याचे हे ते मजेदार आव्हान आहे. विधानसभेच्या तोंडावर आपली लोकप्रियता कायम आहे का? हे पाहण्याची संधी लोकसभेने त्यांना उपलब्ध करून दिली आहे. पक्षश्रेष्ठी व प्रदेशाने जाधव यांना कोणत्याही स्थितीत 'लीड' देण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावरील जवाबदारी वाढली आहे. मागील लढतीत प्रतापराव जाधव यांच्या समक्ष राष्ट्रवादी चे प्रबळ नेते राजेंद्र शिंगणे यांचे कडवे आव्हान होते. त्यामुळे दोन मतदारसंघात जाधवांना कमी लीड मिळाला होता. आता तेच आमदार शिंगणे जाधवांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराला भिडले आहे. यामुळे या दोन मतदारसंघात देखील युतीचा लीड वाढणार हे निश्चित. इतर ४ मतदारसंघात देखील लीड वाढणार आहे. यामुळे यंदाची निवडणूक विक्रमी ठरणार असा राजकीय अभ्यासकांचा अंदाज आहे.
खा.प्रतापराव जाधवांना २०१९ मध्ये असा मिळाला होता लीड...
सिंदखेडराजा: ५९९२
मेहकर: ६३३५
चिखली:२३८६१
बुलढाणा:२५७९३
जळगाव: ३६९८४
खामगाव:३३२७९
पोस्टल : १०४३
मताधिक्य: १३३२८७