ठरलं! उध्दव ठाकरेंनी बुलडाणा जिल्हा शिवसेनेचं आवतन स्वीकारलं; २० मार्चला उध्दव ठाकरे जिल्ह्यात; सिंदखेडराजा आणि मेहकरात घेणार जनसंवाद मेळावा..!

 
Thakre
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना( उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे २० मार्चला बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सिंदखेडराजा आणि मेहकर येथे ते जनसंवाद मेळाव्यांना संबोधित करणार आहेत. काल उद्धव ठाकरे वाशिम - यवतमाळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते, यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत ठाकरे यांची भेट घ्यायला कारंजा येथे पोहचले होते, जिल्हा शिवसेनेच्या वतीने ठाकरे यांना बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी वेळ मागण्यात आली होती,अखेर उध्दव ठाकरे यांनी जिल्हा शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेलं आवतन स्वीकारलं आहे..
याआधी उध्दव ठाकरे २२ फेब्रुवारीला बुलडाणा लोकसभा मतदारसंघाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आले होते. पहिल्या दिवशी चिखली, मोताळा आणि जळगाव जामोद येथील सभांना त्यांनी संबोधित केले होते. मात्र माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन झाल्याने पूर्वनियोजित दौरा अर्धवट सोडून उध्दव ठाकरे यांना मुंबईला परत जावे लागले होते. आता उर्वरित दौरा पूर्ण करण्यासाठी उध्दव ठाकरे पुन्हा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता सिंदखेडराजा तर त्याच दिवशी दुपारी १ वाजता उध्दव ठाकरे मेहकर येथे जनसंवाद मेळाव्यांना संबोधित करणार आहेत.