अखेर भाजप जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटेंनी कठोर पावले उचलली! मेहकरच्या राडाप्रकरणी ६ पदाधिकाऱ्यांचे भाजपातून निलंबन; प्रल्हाद लष्कर, शिव ठाकरेंचा आता भाजपशी संबंध नाही...

 
BJP
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर भाजपमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी भाजपच्या ६ पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष डॉ.गणेश मांटें यांनी तडकाफडकी ही कारवाई केली आहे.
  शिव ठाकरे, प्रल्हाद अण्णा लष्कर, अक्षत दीक्षित, चंदन आडलेकर, रोहित सोळंके, विकास लष्कर यांचे भाजपातून ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मेहकरात तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गटात आज दुपारी राडा झाला. जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लष्कर यांच्या गटाने नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे भाजपा कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला चढवला. यात तिघांचे डोके फुटले होते. माध्यमांत या बातम्या प्रसारित झाल्यानंतर आता भाजपने कठोर पावले उचलली आहेत. ६ पदाधिकाऱ्यांचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉ मांटे यांनी निलंबन केले आहे..