अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी संकटात! विधानभवनात आ.डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले तातडीने उपाययोजना करा

 

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस संपन्न झाला.  नागपूर येथील विधानभवनात आज ११ डिसेंबर रोजी माजी अन्न औषध प्रशासन मंत्री तथा आमदार डॉ. शिंगणे यांनी बुलडाणा जिल्ह्यातील  शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या.

अतिवृष्टी गारपिटीमुळे  नुकसानीमध्ये सिंदखेडराजा,देऊळगावराजा,लोणार चिखली, तालुक्यात शेडनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मध्ये शेडनेटचा समावेश करावा, बदलत्या हवामानाचा अभ्यासपूर्ण आढावा घेत उपायोजना कराव्या अशी मागणी आ. डॉ. शिंगणे यांनी केली. येलो मोझॅक मुळे पीक उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट झाली आहे. इतकच नाही तर कापूस दरवाढीसाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र सुरू करावे. वन्य प्राण्यांमुळे शेती जीवनावर होणारा परिणाम रोखण्यासाठी उपाययोजना करावी अशा मागण्या डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सभागृहात केल्या.