डोणगावात आज शेतकरी शेतमजूर मेळावा! वन बुलढाणा मिशन व महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे आयोजन; भूमिहीन, शेतमजूर, कामगार, अपंग, निराधारांच्या प्रश्नांना संदीप शेळके फोडणार वाचा
Dec 24, 2023, 10:05 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलढाणा मिशन आणि महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आज, २४ डिसेंबर रोजी मेहकर तालुक्यातील डोणगाव येथे शेतकरी शेतमजूर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेसमोरील आठवडी बाजार मैदानावर दुपारी दोन वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
जाहिरात 👆
वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके व महाराष्ट्र गरीब ग्रेड संघटनेचे प्रमुख दिलीप गायकवाड प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. भूमिहीन, शेतमजूर, कामगार, अपंग, निराधार यांचे प्रश्न मांडणारा हा हक्काचा मेळावा असणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.