राज्यातील दळभद्री सरकारच्या नाकर्तेपणामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा घणाघात! म्हणाले, दुष्काळ असतानाही जिल्ह्यातील शेतकरी मात्र मदतीपासून वंचित;
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे सातत्याने सांगत आहोत त्याचा प्रत्यय आजही येत आहे. जिल्ह्य़ातील अनेक भागात दुष्काळ पडलेला असताना भाजपा सरकारने फक्त सत्ताधारी पक्षांच्या आमदारांचे मतदारसंघ असलेल्या २ तालुक्यातच दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. सरकारला शेतकऱ्यांची व्यथा व दुःख दिसत नाहीत म्हणून गेंड्याच्या कातडीच्या बधिर भाजपा सरकार विरोधात काँग्रेस पक्षाने आक्रोश मोर्चा काढून धिक्कार केला असल्याचे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी म्हटले आहे.
जाहिरात👆
शेतकरी विरोधी भाजपा सरकारचा तीव्र निषेध करत बुलढाण्यात राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस मुख्यालय गांधी भवन येथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला, त्याची माहिती देताना जिल्हाध्यक्ष बोंद्रे पुढे म्हणाले की, भाजपा सरकारने अन्नदात्याला वाऱ्यावर सोडलेले आहे, आधी अवकाळी पाऊस व नंतरच्या दुष्काळाने शेतकरी संकटात सापडलेला आहे. शेतमालाला भाव मिळत नाही, सोयाबीन कापूस सह इतर शेतमालाची खरेदी केंद्रे अजून सुरु केलेली नाहीत. मुठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी ही खरेदी केंद्रे सुरु केली जात नाहीत का? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
राज्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना दुष्काळ जाहीर झालेला नाही. दोन तालुक्यांना दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले आहे आणि इतर तालुक्यांना त्यामधून वगळण्यात आले.बुलदाणा जिल्ह्यातील सोयाबीनचे पीक हे अतिशय महत्त्वाचे पीक आहे,यावेळी सोयाबीनचे पीक हातातून गेलंय. अर्ध उत्पन्न मोठ्या मुश्किल ने मिळाले त्यात सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन कापूस अनेक शेतमालाचे भाव प्रचंड पडलेले आहे गडगडले आहेत .अशावेळी शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे,त्यात आता नवीन पीक मिळायचं तर एम एसईबीचा अत्यंत भोंगळ कारभार सुरू झालेला आहे. महावितरणणे ज्याठिकाणी वीज पुरवठा सुरळीत पोहोचवायला पाहिजे त्या ठिकाणी आठ तास ही होऊ शकत नाहीये, होल्टेज डाऊन झालेली आहे नवीन पिक पण शेतकऱ्यांना मिळण्यासाठी अडचण झालेली आहे असे राहुल बोंद्रे म्हणाले..
गुन्हेगार व माफियांना संरक्षण देणारे सरकार..
राज्यातील भाजपाचे सरकार हे गुन्हेगार व माफिया यांना संरक्षण देणारे सरकार आहे. ड्रग माफिया ललित पाटीलला पुण्याच्या ससून रुग्णालयात फाईव्ह स्टार सुविधा दिल्या गेल्या, मैत्रिणीला भेटू दिले, विदेश पर्यटन करु दिले हे उघड झाले आहे. पैसा घेऊन गुन्हेगारांना सुविधा देण्याचा प्रकार फक्त येरवडा जेलमध्येच होतो असे नाही तर राज्यातील जेलमध्ये जेथे जेथे सरकारचे बगलबच्चे आहेत तिथे अशा फाईव्ह स्टार सुविधा पुरवल्या जातात. ड्रग माफिया ललीत पाटील सारखे असे किती गुन्हेगार जेलची शिक्षा झाली असताना फाईव्ह स्टार सुविधा मिळवतात त्याची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधिशांमार्फत चौकशी केली जावी, अशी मागणी याआधीच केली असल्याचे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले .
यावेळेस जिल्हा काँग्रेस शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी डाॅ. किरण पाटील यांना निवेदन देण्यात आलर. आमदार धीरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, प्रदेश सरचिटणीस श्यामभाऊ उमाळकर, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, संजय राठोड, प्रदेश सचिव स्वातीताई वाकेकर, जयश्रीताई शेळके, मनोज कायंदे, विजय सावळे, गणेशसिंह राजपूत, रिजवान सौदागर, नंदु शिंदे, अनिकेत मापारी, प्रकाश पाटील, शैलेश खेडकर, सरस्वतीताई खाचने, सौ. आशाताई गोंड, शेख समद, गजानन मामलकर, अर्जुन घोलप, जावेद कुरेशी, रवी पाटील, बाजीराव पाटील, तुळशीराम नाईक, दत्ताभाऊ काकस, सुनिल तायडे, विजय काटोले, मनोज वानखेडे, देवानंद पवार, सै. ईरफान, गजानन लांडे ,सचिन बोंद्रे, गजानन काकड, शैलेश खेडकर, पंकज हजारी, डाॅ. सतेंद्र भुसारी, सतिष मेहेंद्रे, सुनिल सपकाळ, रईस जमादार, डाॅ. पुरूषोत्तम देवकर, राम डहाके, विनोद बेंडवाल, कचरूजी भारस्कर, विजयसिंह राजपूत, गजनफर खान, अरविंद पाटील, आरिफ खान, साहेबराव चव्हाण, एकनाथ चव्हाण, शिवराज पाटील, गणेश जवंजाळ, मदन जंजाळ, आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.