Amazon Ad

शेतकऱ्यांनो सावध व्हा! बुलडाणा जिल्ह्यात आज, उद्या, परवा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. शेतकऱ्यांचे रब्बी हंगामातील पीक असलेल्या गहू, हरबऱ्यावर संकट घोंगावत आहे. नगापुरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने यासंदर्भातील भाकीत वर्तवले आहे. बुलडाणा जिल्ह्यात आज,२५ फेब्रुवारीला वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट व अवकाळी पावसाची शक्यता आहे. उद्या, २६ व परवा २७ फेब्रुवारीला तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. संभाव्य धोका लक्षात घेता शेतकऱ्यांनी कापणी, मळणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.