अवकाळी पाऊस, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार २२० कोटींची मदत;पावणेतीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा : खा. जाधव यांच्या पाठपुराव्याला यश

 
khasdar

बुलढाणा(बुलढाणा लाईव्ह वृत्तसेवा):राज्य सरकारने ३१ जानेवारी २०२४ च्या शासन निर्णयानुसार १ लाख ५७ हजार १८० हेक्टर बाधित क्षेत्रातील २ लाख ७६ हजार ५७५ शेतकऱ्यांना २२० कोटी ३४ लाख रुपयांची मदत दिली आहे. लवकरच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे खा. जाधव यांनी सांगितले.

add

नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले होते. बुलढाणा तालुक्यातील पाडळी, धाड, म्हसला बुद्रुक, चिखली तालुक्यातील चिखली, हातणी, उंद्री, धोडप, अमडापूर, पेठ, एकलरा, कोलारा, मेरा, शेलगाव आटोळ, आंधई, चांधाई मोताळा तालुक्यातील पिंपरी गवळी, शेलापूर, मोताळा, बोराखेडी, रोहिणखेड, मलकापूर तालुक्यातील दाताळा, धरणगाव, खामगाव तालुक्यातील पारखेड, हिवरखेड, लाखनवाडा, काळेगाव, जनुना वझर, आवार, संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा, मेहकर तालुक्यातील अंजनी, शेलगाव देशमुख, डोणगाव, कल्याण, हिवरा आश्रम, लोणी गवळी, मेहकर, जानेफळ, वरवंड, नायगाव दत्तापूर, देऊळगाव माळी, लोणार तालुक्यातील हिरडव, टिटवी, सुलतानपूर, लोणार, बीबी, अंजनी खुर्द, देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव राजा, तुळजापूर, मेहुणा राजा, देऊळगाव मही या गावांमधील शेतकऱ्यांना पीक नुकसानीमुळे मोठा आर्थिक फटका बसला.

खा. प्रतापराव जाधव यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून तत्काळ सर्वेक्षण करून अहवाल शासनास पाठवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. तसेच शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. नुकसानभरपाई मिळण्याकरिता आम्ही कटिबद्ध असल्याचे आश्वासन खा. प्रतापराव जाधव यांनी दिले होते. मदत दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचे खासदारांनी आभार मानले.यापूर्वी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा वसुलीसाठी वळती करू नये, याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना द्याव्यात, असे खा. जाधव यांनी म्हटले आहे.