बोचऱ्या थंडीतही सव्वाशे गावे "या' कारणामुळे तापणार!
मेहकर तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या ३१, चिखलीतील ११ ग्रामपंचायतींच्या १५, मोताळ्यातील १४ ग्रामपंचायतींच्या १५, नांदुऱ्यातील १३ ग्रामपंचायतींच्या १८, मलकापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या १३, खामगावमधील १५ ग्रामपंचायतींच्या २२ रिक्त सदस्य पदांकरिता ही पोटनिवडणक रंगणार आहे. जळगाव जामोदमधील ८ ग्रामपंचायतींच्या १४, शेगाव व लोणारमधील प्रत्येकी ८ ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ८, सिंदखेड राजामधील ४ ग्रामपंचायतींच्या ४, देऊळगाव राजा मधील ५ ग्रामपंचायतींच्या ६ तर बुलडाणा तालुक्यातील २ ग्रामपंचायतींच्या २ रिक्त जागांसाठी लढती रंगणार आहे.
१८ नोव्हेंबरला ठरणार मतदार...
दरम्यान या लढतीसाठी १ नोव्हेंबर २०२१ रोजीची मतदार यादी ग्राह्य धरून प्रभागनिहाय मतदार यादी मागील १२ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यावर १६ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. या १६६ जागांसाठी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या १८ नोव्हेंबरला प्रसिद्ध करण्यात येतील. यामुळे चालू महिन्यातच निवडणुका लागण्याची दाट शक्यता असल्याने १२४ ग्रामपंचायत क्षेत्रातील वातावरण व राजकारण कडाक्याच्या थंडीतही तापले आहे. राजकीय हालचालींना वेग आला असून, गाव पुढारी अन् इच्छुकांनी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.