एल्गार रथयात्रेला' सिंदखेडराजा तालुक्यात मिळाला प्रचंड प्रतिसाद! रविकांत तुपकर म्हणाले, जिजाऊंच्या पावन भूमीत लढण्याचं बळ मिळते !

 
Nxnnx
सिंदखेड राजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी दोन आदर्श छत्रपती घडविले. शिवरायांच्या हाती सोन्याचा नांगर देऊन जिजाऊंनी शेतकऱ्यांच्या अंगात बळ भरले होते. दुष्काळ पडला असतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अन्नधान्याची कोठारे खुली केली होती. शेतकऱ्यांना प्रचंड मदत केली होती. मात्र आज राज्यात दुष्काळ पडला असतांना सरकार मात्र झोपेच सोंग घेऊन बसलेलं आहे. अशा सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन राजकारण करण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. नुसता दुष्काळ जाहीर करून होणार नाही, शेतकऱ्यांना तातडीने मदत करा अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे. तुपकर सिंदखेडराजा तालुक्यात शेतकऱ्यांशी संव्वाद संवाद साधत आहेत.
  Add
                       जाहिरात👆
रविकांत तुपकर यांची सोयाबीन-कापूस एल्गार रथयात्रा ६ व्या दिवशी काल ९ नोव्हेंबर रोजी मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यात दाखल झाली. तालुक्यातील बीबी, दुसरबीड, पिंपळगाव कुडा, केशव शिवणी, राहेरी, जांभोरा, सोनोशी, वर्दडी, सुलसगाव, चिंचोली, अडगावराजा, सावखेड तेजन, पिंपरखेड, वडळी, मारखेड, हनवतखेड, खामगाव खापरखुटी, पळसखेड चक्का, पिंपळगाव लेंडी व किनगावराजा या गावात ग्रामस्थांनी प्रचंड उत्साहात स्वागत केले. काही गावे यात्रेच्या नियोजित मार्गात नसतांनाही गावकऱ्यांनी आग्रहपूर्वक त्यांच्या गावात नेत जंगी कार्यक्रम घेतले. मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यातील लोकांचे प्रेम व आपुलकीने केलेला पाहुणचार कायम स्मरणात राहील, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी यावेळी केले. सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी चळवळीला आणि आंदोलनाला कायमच बळ दिले आहे. २० नोव्हेंबर रोजी बुलढाणा येथे एल्गार महामोर्चा धडकणार आहे. कापूस-सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठीचा हा मोर्चा आहे. सिंदखेड राजा तालुक्यातील प्रत्येक गावांमधील शेतकरी, शेतमजूर, तरुणांनी व मायमाऊलींनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.
'एल्गार रथयात्रे'च्या खर्चासाठी शेतकरी काढतायेत लोकवर्गणी
Bxnf
रविकांत तुपकरांची 'एल्गार रथयात्रा' ही मेहकर तालुक्यातील हिवरा खुर्द या गावी गेली असता तेथील गावकऱ्यांनी पै-पै गोळा करत 'एल्गार रथयात्रे' साठी २५ हजार रुपये लोकवर्गणी दिली. तर मारोती पेठ येथील शेतकरी नंदकिशोर निकस यांनी ११ हजार रुपयांचा निधी यात्रेसाठी दिला. लोकांचे माझ्यावर असलेले हे प्रेम, जिव्हाळा आणि महत्त्वाचे म्हणजे विश्वास या चळवळीसाठी उर्जास्त्रोताचे काम करत आहे. शेतकर्याकच्या पोटी जन्माला आलो ही माझी पुण्याई. आता माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत यांच्यासाठी लढत राहणार, अशा भावना रविकांत तुपकरांनी यावेळी व्यक्त केल्या.