सोमठाणा गावात एल्गार रथयात्रेचे दणक्यात स्वागत! जेसीबीतुन झाला पुष्पवर्षाव; रविकांत तुपकरांनी गळ्यात मृदंग अडकवत धरला हरिनामाचा ठेका; पहा व्हिडिओ..

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात उद्या,२० नोव्हेंबरला सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार महामोर्चा निघणार आहे. ५ नोव्हेंबरपासून संत नगरी शेगावातून सुरू झालेली एल्गार रथयात्रा आज,१९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चिखली तालुक्यातील सोमठाणा गावात पोहचली. यावेळी गावकऱ्यांनी तुपकर यांचे जोरदार स्वागत केले.
एल्गार रथयात्रा गावात पोहचताच गावकऱ्यांनी जेसीबी मशीन ने पुष्पवर्षाव करून रविकांत तुपकर यांचे स्वागत केले. गावातील वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजरात तुपकर यांची मिरवणूक केली. गावातील महिलांनी तुपकर यांचे औक्षण केले. गावातील रस्ते यावेळी रांगोळी व फुलांनी सजवलेले होते. यावेळी रविकांत तुपकर यांनीही गळ्यात मृदंग अडवकत यावेळी हरिनामाचा ठेका धरला. 
उद्या एल्गार महामोर्चा..
एल्गार रथयात्रेचा आज किन्होळा गावात शेवटचा मुक्काम आहे. उद्या सकाळी एल्गार रथयात्रा केळवद - येळगाव मार्गे बुलडाणा शहरात पोहचणार आहे. दुपारी १२ वाजता जिजामाता प्रेक्षागार मैदानातून एल्गार महामोर्चा सुरू होणार आहे. तत्पूर्वी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकल्यावर रविकांत तुपकर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत..