निवडणुका तोंडावर! खा.जाधवांच्या जवळच्या माणसाने साथ सोडली; शहर प्रमुखपदाचा आणि पक्षाचा राजीनामा

 
Bxhx
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना जिल्ह्याची राजकीय राजधानी अशी ओळख असलेल्या चिखलीतून राजकीय बातमी समोर आली आहे. शिवसेनेच्या चिखली प्रमुखांनी आपल्या पदाचा आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा राजीनामा आल्याने खा.प्रतापराव जाधव यांच्यासाठी हा धक्का मानल्या जात आहे.
Hdhd
  विशेष म्हणजे नियुक्ती होऊन वर्षभराचा कालावधी होत नाही तोच विलास घोलप यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. विलास घोलप हे खा.प्रतापराव जाधव यांचे विश्वासू म्हणून घोलप यांनी ओळख आहे. मात्र अचानक तडकाफडकी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. खा.प्रतापराव जाधव यांना राजीनामा पत्र लिहून तो स्वीकारण्याची विनंती घोलप यांनी केली आहे. दरम्यान बुलडाणा लाइव्ह ने यासंदर्भात विचारणा केली असता, कोणतीही नाराजी नाही, व्यक्तिगत कारणास्तव राजीनामा देत असल्याचे घोलप म्हणाले..