खा. प्रतापराव जाधवांनी उमेदवारी अर्ज भरला! मिरवणूक काढून करणार शक्तीप्रदर्शन

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार प्रतापराव जाधव यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विजयराज शिंदे सोडून जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी होते. दुपारी साडेअकराच्या सुमारास खा. जाधव नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. दरम्यान अर्ज दाखल करण्यात केल्यानंतर खासदार जाधव जंगी शक्ती प्रदर्शन करणार आहे, त्यानंतर जाहीर सभा देखील होणार आहे.
खा.जाधव यांचा अर्ज भरतेवेळी मंत्री. गुलाबराव पाटील, आ. डॉ.राजेंद्र शिंगणे,आ. संजय कुटे, आ. श्वेताताई महाले, आ.संजय गायकवाड, आ.आकाश फुंडकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.