खा. प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज जानेफळात भव्य मोफत आरोग्य शिबीर! अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उदघाटन दिनीच सामाजिक उपक्रम;

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे राहणार उपस्थित...
 
Fghj
मेहकर (अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय संवाद व माहिती तंत्रज्ञान समिती अध्यक्ष तथा खासदार प्रतापराव जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन जानेफळ येथे करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तसेच डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन , अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जानेफळ यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी १० ते दुपारी ४ वाजेच्या वेळेत शिबीर संपन्न होईल. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते अंबिका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उदघाटन करण्यात येणार आहे. मंगेशजी चिवटे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत कक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे ओएसडी & विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय हे भव्य मोफत आरोग्य शिबिर उदघाटनाला येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा प्रतापराव जाधव हे असणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ संजय रायमुलकर बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रमुख रामहरी राऊत प्रमुख उपस्थिती प्रा बळीराम मापारी जिल्हाप्रमुख शिवसेना, ऋषी जाधव युवासेना जिल्हा प्रमुख ,माधवराव जाधव सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मेहकर, शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश तात्या वाळूकर ,डॉ अनिलकुमार गाभणे गोपालभाऊ मोदाणी अध्यक्ष महेश परिवार मेहकर युवासेना तालुकाप्रमुख भुषण घोडे जानेफळ ग्रामपंचायत चया सरपंच सौ रुपाली गजानन वडणकर हे उपस्थित राहतील. 
Dhkf 
भव्य मोफत आरोग्य शिबीराला गरजू रुग्णांनी उपस्थित राहून लाभा घ्यावा असे आवाहन अंबिका परिवाराचे संस्थापक अध्यक्ष मोहन पाटील धोटे, डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशनचे पश्चिम विदर्भ समन्वयक अमर राऊत सामाजिक कार्यकर्ते प्रा कृष्णा हावरे, मा.सरपंच तथा शिवसेना नेते किशोर पाटील गव्हाड, डॉ नितीन एम मारोडकर डॉ अश्विनी एन मारोडकर रुपेश पंडीतराव धोटे पाटील, डॉ राहुल चनखोरे, डॉ स्वाती चनखोरे डॉ भगवान मेटांगळे, डॉ शरयु बोडें यांनी केले आहे.