खा. प्रतापराव जाधवांसाठी मनसे मैदानात! मनसे नेते विठ्ठल लोखंडकार म्हणाले, खा.प्रतापराव जाधवांना बहुमताने निवडून आणू! खा.जाधव यांनी साधला मनसे पदाधिकाऱ्यांशी संवाद.
Apr 19, 2024, 08:21 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): येत्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांना जिल्ह्यातून जास्तीत जास्त मतदान मिळावा, यासाठी सर्व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते तन मन धनाने काम करतील. महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांना जास्तीत जास्त मताने निवडून आणणे हा एक मात्र मनसेचा निर्धार असेल अशी ग्वाही मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांनी दिला.
Advt. 👆
चिखली येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित बैठकीदरम्यान बोलत होते. यावेळी बैठकीला महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, चिखलीच्या भाजपाचे आमदार श्वेताताई महाले, सहित भास्करराव मोरे, शरद हाडे अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांनी मित्र पक्ष असलेल्या मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी निवडणूक प्रचारासंदर्भात चर्चा केली.
मागील पंधरा वर्षात आपण जिल्ह्यात उभा केलेला विकासाचा झंजावात याचा आढावा घेत खा. जाधव म्हणाले की, बुलढाण्यात मागील शंभर वर्षांपासून रेल्वे मार्गाचा प्रश्न राखलेला आहे हा प्रश्न आतापर्यंत एकाही प्रतिनिधींनी मार्गी लावला नाही मात्र आपण वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठपुरावा करून खामगाव जालना रेल्वे मार्ग लावला. वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्प मार्गी लागत आहे. येणारा काळ हा जिल्ह्याच्या भविष्यासाठी सुजलाम सुफलाम असाच राहील अशी यावेळी खा.जाधव यांनी दिली. यावेळी महाराष्ट्र उपाध्यक्ष विठठल लोखंडकार, जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, लक्ष्मण जाधव, उप जिल्हाध्यक्ष राजेश परिहार, बुलढाणा तालुका अध्यक्ष अमोल रिंढे पाटील, चिखली तालुका अध्यक्ष विनोद खरपास, शैलेश गोंधणे, डॉ.काळे, विदयार्थी जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, जिल्हा संघटक प्रदीप भंवर, तालुका उपाध्यक्ष संदीप नरवाडे, विजय पडोळ, प्रवीण देशमुख, रवि वानखेडे, अमोल गोरे, मनोज पवार आदी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.