आरोग्यदूत खा. जाधव! प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून जनतेसाठी ४४६९ कोटींच्या आरोग्य सुविधा उपलब्ध! वाचा काय काय केलं...

 
Ghkf

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गोरगरीब जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी शासनाकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुसज्ज बनली. नुसतेच पद न मिरविता जनतेच्या सेवेचे व्रत घेऊन प्रत्यक्षात सर्व सोयी, सुविधा उपलब्ध करून देणे हा खासदार प्रतापराव जाधव यांचा स्वभाव. जनतेचे आरोग्य सुदृढ राहावे, कोणताही आजार जडल्यास गरजू रुग्णांना पुरेशी आरोग्य सुविधा व वेळेत औषधोपचार मिळावेत म्हणून जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सुसज्ज असावी यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी वेळोवेळी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आणि कोट्यवधींचा निधी खेचून आणला. त्यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने तब्बल ४४६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आरोग्य विषयक समस्या दूर करण्यात खासदार जाधव यांनी यश मिळविले आहे. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने नागरिकांमध्येही एक वेगळे समाधान व्यक्त होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी शासनाकडे भक्कम पाठपुरावा केला. त्याचेच फलित म्हणून आज जिल्हावासियांना उत्तम प्रकारचे औषधोपचार मिळत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुठलीही उणीव राहू नये, येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना विनाउपचार परत जाण्याची गरज पडू नये यासाठी भरीव निधीची मागणी खासदार प्रतापराव जाधव यांनी केली होती. त्याचप्रमाणे आरोग्य सेवा पुरविणारे डॉक्टर व कर्मचारी वेळेत उपलब्ध व्हावेत, त्यांच्या निवासस्थानाचा प्रश्न सुटावा याकरिता देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी आग्रहाने शासनाकडे निवासस्थान बांधकामे करण्याची मागणी केली होती. आरोग्य सेवा व निवासस्थाने यासाठी ४४६९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि कामेही पूर्णत्वास गेली. जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये ६० ठिकाणी इमारती उभारण्यात आल्या.
ग्रामीण भागात सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभी राहिल्याने जनतेला आता आपल्या गावाच्या ठिकाणीच औषधोपचार करणे सहज शक्य झाले आहे. पूर्वी आरोग्य केंद्र असूनही तेथे सुविधा नसायच्या. त्यामुळे रुग्णांना इलाजाकरिता तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी हलवावे लागायचे, ही कटू वेळ आता प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून आरोग्य सेवा मिळू लागल्याने टळली असल्याचे नागरिक सांगत आहेत.
बुलडाण्यात १०० खाटांचे सुसज्ज स्त्री रुग्णालय 
बुलडाणा येथे महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय मंजूर करून घेण्यासाठी देखील खासदार प्रतापराव जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. केंद्राच्या सीईसीआरपी-२;अंतर्गत शंभर खाटांचे जिल्हा महिला रुग्णालय मंजूर झाले. त्यासाठी सहा कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आणि तातडीने काम सुरू होऊन सुसज्ज स्त्री रुग्णालय आज रुग्ण महिलांच्या सेवेत सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात ईसीआरपी दोन अंतर्गत ५० खाटांचे चार कोटींचे रुग्णालय बांधकाम करण्यात आले. 
शस्त्रक्रियेसाठी दहा कोटींची अत्याधुनिक यंत्रसामग्री 
बुलडाणा जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात ईसीआरपी-२ अंतर्गत शस्त्रक्रिया करण्यासाठी लागणारे आधुनिक साहित्य खरेदी करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी निधीची मागणी केली. शासनाने तातडीने दखल घेत साहित्य खरेदी करण्यासाठी मंजुरी देऊन निधी पाठवला. आज रुग्णालयात आधुनिक शस्त्रक्रियेची सोय गोरगरिबांसाठी उपलब्ध झाली आहे.
किडनी रुग्णांसाठी डायलिसिस केंद्र 
जिल्हा सामान्य रुग्णालया अंतर्गत मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, जळगाव जामोद व खामगाव येथे किडनी आजाराच्या उपचारासाठी डायलिसिस केंद्र उभारण्यासाठी ९.७३ कोटी रुपये शासनाकडून खासदार प्रतापराव जाधव यांनी मंजूर करून आणले. ही डायलेसिस केंद्र उभारण्याचे काम पूर्णत्वास येत आहे.
बुलडाण्यात क्रिटिकल केअर युनिटसाठी ३० कोटी 
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातच रुग्णांच्या सेवेत आणखी एक क्रिटिकल केअर युनिट उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हे युनिट निर्माण करण्यासाठी खासदार प्रतापराव जाधव यांनी मागणी लावून धरली होती. ही मागणी पूर्ण करण्यातही त्यांना यश मिळाले. जिल्ह्यात ५० बेडच्या अत्याधुनिक क्रिटिकल केअर युनिटसाठी शासनाने ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या क्रिटिकल केअर युनिटचे ऑनलाइन भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यापूर्वीच पार पडले. येत्या काही महिन्यांमध्ये हे युनिट रुग्णांच्या सेवेत रुजू होणार असल्याने जिल्ह्यातील जनतेला आता नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये उपचारासाठी जाण्याची गरज पडणार नाही, अशी व्यवस्था केवळ खासदार प्रतापराव जाधव यांच्यामुळे उभी राहणार आहे.