खा. जाधवांच्या भेटीनंतरही आमदार गायकवाड लढण्यावर ठाम..!

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांनी बुलडाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून आज एकच खळबळ उडवून दिली होती. विद्यमान खा. शिंदेंच्या शिवसेनेचे खा.प्रतापराव जाधव असताना आणि त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात असताना आ.गायकवाड यांनी टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल आज तुफान चर्चा रंगली. कदाचित त्यांना एबी फॉर्म मिळाला असेल अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दुपारी खा.प्रतापराव जाधव यांनी दिली होती. दरम्यान खा.जाधव यांनी  आ.गायकवाड यांची भेट घेण्यासाठी त्यांचे कार्यालय गाठले. खा. जाधव आणि आमदार गायकवाड यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. मात्र या चर्चेनंतर देखील आमदार गायकवाड लढण्यावर ठाम आहे.

 ही नेहमीसारखी भेट झाली. ही भेट पूर्वनियोजित होती. उद्या बुलडाण्यात महायुतीचा मेळावा आहे, त्यासंदर्भात चर्चा झाली. मी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावर या भेटीत चर्चा झाली नसल्याचे आ.गायकवाड म्हणाले. उमेदवारी अर्ज लढण्यासाठीच भरल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.