Amazon Ad

BREAKING खा. प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाडांच्या भेटीला! बंददाराआड चर्चा सुरू

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आमदार संजय गायकवाड यांनी आज बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरून एकच खळबळ उडवून दिली. शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर झालेली नसताना आमदार गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपण लढण्यासाठीच उमेदवारी अर्ज भरल्याचे वक्तव्य आमदार गायकवाड यांनी केले होते. दरम्यान आता या संपूर्ण घडामोडीला पुन्हा एकदा नाट्यमय वळण मिळाले असून खासदार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.

 थोड्या वेळापूर्वी आमदार गायकवाड उमेदवारी अर्ज भरून त्यांच्या मातोश्री कार्यालयावर पोहोचले. त्यानंतर आमदार गायकवाड यांच्या कार्यालयावर खा. जाधवांचे आगमन झाले. सध्या आमदार गायकवाड आणि खासदार प्रतापराव जाधव यांची बंद दाराआड चर्चा सुरू आहे.