गारपिटीनंतर खा. प्रतापराव जाधव पहाटेच शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले; अधिकाऱ्यांना बोलावून घेत केल्या महत्वाच्या सुचना! म्हणाले, शेतकऱ्यांना भरपाई मिळवून देऊ
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, लोणार तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पावसासह गारपीट झाली यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची माहिती मिळताच खा.प्रतापराव जाधव यांनी पूर्वनियोजित कामे बाजून पहाटेच शेतकऱ्यांच्या बांधावर धाव घेत नुकसानीची पाहणी केली. अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का, माळ सावरगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन खा.प्रतापराव जाधव यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नेट शेड, भाजीपाला, तुर, गहू ,हरभरा पिकांच्या शेतात पाणी साचलेले आहे तर कुठे गारांचा थर असल्याचे थर असल्याचे खा.जाधव यांनी बुलडाणा लाइव्ह शी बोलताना सांगितले. दरम्यान खा.जाधव यांनी जिल्हाधिकारी,जिल्हा कृषी अधिकारी यांना तातडीने आजच्या आज पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी संबधित अधिकाऱ्यांना खा.जाधव यांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर बोलवून घेत आवश्यक त्या सूचना दिल्या. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी निर्दोष पंचनामे करा. त्याची एक प्रत ग्रामपंचायत कार्यालयावर लावा अशा सूचना यावेळी खा.जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शासनदरबारी पाठपुरावा करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे खा.जाधव यावेळी "बुलडाणा लाइव्ह" शी बोलताना म्हणाले..