खा. प्रतापराव जाधव आणि अंबादास दानवे आमने - सामने येणारच होते पण..वाचा जिल्हाधिकारी कार्यालयात काय घडलं..!

 
hjbj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी आज बुलडाण्यात शिवसेना मेळाव्याला संबोधित केले. यावेळी आ. संजय गायकवाड आणि खा. जाधव यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली. कार्यक्रम आटोपल्यानंतर आ. दानवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात खा. प्रतापराव जाधव एक बैठक घेत होते.

विरोधी पक्षनेते दानवे खालच्या सभागृहात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करीत होते तर खा.जाधवांची वरच्या सभागृहात बैठक सुरू होती. शिंदे गटात गेलेले खा.जाधव आणि  विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे जिल्हाधिकारी कार्यालयात असल्याने ते आमने सामने आलेच तर काय होईल, ते काय बोलतील, एकमेकांना अभिवादन करतील का याकडे साऱ्यांच्या नजरा लागून होत्या.

पोलिसांनी सुद्धा कधी नव्हे तेवढा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. मात्र अंबादास दानवे आले, जिल्हाधिकाऱ्यांना भेटले अन निघूनही गेले, मात्र ते जाईपर्यंत खा. जाधव काही खाली उतरलेच नाहीत.