खा. प्रतापराव जाधवांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर कार्यक्रमांची रेलचेल! उद्या मेहकरात "चला हवा येऊ द्या" ला उसळणार गर्दी! भाऊ कदम, मानसी नाईक, श्रेया बुगडे उद्या मेहकरात..!

 
mansi
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव यांचा २५ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. सलग तीनदा आमदार आणि तीनदा खासदार म्हणून निवडून आलेल्या या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभर विविध सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या ,२५ नोव्हेंबरला मेहकरात "चला हवा येऊ द्या " या विनोदी कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळणार आहे.
   

विशेष म्हणजे खा. जाधव यांचा वाढदिवस आणि आमदार रायमुलकर यांचे पुत्र युवा नेते नीरज रायमुलकर यांचा वाढदिवसही उद्या,२५ नोव्हेंबरला आहे. काल, २३ नोव्हेंबरला श्री.शिवाजी हायस्कूल येथे कुस्त्यांची स्पर्धा पार पडली. आज, २४ नोव्हेंबरला मेहकरमधील सोनाटी चौफुली येथे भव्य शंकरपट स्पर्धा पार पडत आहे. आज,संध्याकाळी कारखेड येथे भास्करराव राऊत यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, पहाटे खा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते शारंगधर बालाजीचा अभिषेक व पूजा संपन्न होईल.

उद्या संध्याकाळी "चला हवा येऊ द्या" हा विनोदी कार्यक्रम मेहकर येथील महिला महाविद्यालयात पार पडणार आहे. यावेळी अभिनेत्री मानसी नाईक,माधुरी पवार यांच्या नृत्यकलेचा अविष्कार सादर होणार आहे. अभिनेते भाऊ कदम, श्रेया बुगडे यांच्यासह चला हवा येऊ द्या ची संपूर्ण टीम उद्याच्या कार्यक्रमाचे आकर्षण असणार आहे.