BREAKING जिल्ह्याच्या राजकारणात भूकंप! आमदार संजय गायकवाड अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले; बुलढाणा लाइव्ह च्या बातमीवर शिक्कामोर्तब...

 
संजय
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): थोड्या वेळापूर्वी बुलडाणा लाइव्हने आमदार संजय गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रकाशित केले होते. या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले असून आमदार संजय गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहचले आहेत.
रहजब
आमदार गायकवाड त्यांच्या निवडक समर्थकांसह निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत. उबाठा शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र खेडेकर हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आहेत, मात्र ते नेमके कशासाठी पोहोचले हे अद्याप समोर आले नाही.संजय गायकवाड एक अर्ज शिंदेंच्या शिवसेनेकडून दाखल करणार असून एक अर्ज अपक्ष दाखल करणार आहेत