सिंदखेडराजात डॉ.राजेंद्र शिंगणेंचाच जलवा! कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १८ जागा जिंकल्या

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वाचाच करिश्मा कायम राहिला. काल, झालेल्या मतमोजणीत डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सहकारमहर्षी स्व. भास्करराव शिंगणे पॅनलने १८ पैकी १८ जागांवर दणदणीत विजय मिळवला.
निवडणुकीसाठी काल रविवारी दुपारी मतदान व सायंकाळी मतमोजणी झाली. या निवडणुकीत सिंदखेडराजा व मलकापूर पांग्रा या दोन मतदान केंद्रावर मतदान झाले.१४५७ पैकी १३०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीने स्वतःच्या पराभवाची तयारी केली होती,कारण १८ पैकी केवळ १० जागांवर उमेदवार उभे केले होते. अखेर जे व्हायचं तेच झालं.. डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या नेतृत्वातील सहकारमहर्षी भास्करराव शिंगणे पॅनल ने दणदणीत विजय मिळवला.