सिंदखेडराजा मतदार संघातील २५.२६ कोटींच्या विकासकामांना मंजुरात आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नांना यश
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पामध्ये सिंदखेडराजा मतदार संघातील २५ कोटी २६ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन प्रलंबित असलेल्या विविध विकास कामांची मागणी केली होती. या मागणीला यश आले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर कामांना निधी मंजूर केला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामांना मान्यता दिली आहे.
यामध्ये ५ कोटी ३१ लाख ३६ हजार रूपये खल्याळ गव्हाण, सिनगांव जहाँगिर, पांग्री, देऊळगाव राजा, उंबरखेड, जवळखेड रस्ता, पुलाचे बांधकाम करणे, ८८ लाख ५६ हजार रूपये सिनगांव जहांगीर ते मेहुणा राजा ते रोहणा सावंगी हिवरखेड, किनगाव राजा, उमरद, अडगाव राजा, चिंचोली रस्ता, लहान पुलाचे बांधकाम, २ कोटी रूपये देऊळगाव राजा, गिरोली बु.-निमखेड गोळेगांव रस्ता, लहान पुलाचे बांधकाम करणे, २ कोटी रूपये सिनगांव जहांगीर ते मेहुणा राजा ते रोहणा सावंगी, हिवरखेड, किनगांव राजा, उमरद, अडगाव राजा, चिंचोली रस्ता, पक्क्या नालीचे बांधकाम करणे, ६ कोटी ४६ लाख १६ हजार रूपये सिनगांव जहांगीर ते मेहुणा राजा ते रोहणा सावंगी, हिवरखेड, किनगाव राजा, उमरद, अडगाव राजा, चिंचोली रस्त्याची सुधारणा करणे, १ कोटी रूपये खल्याळ गव्हाण, सिनगांव जहाँगिर, पांग्री, देऊळगाव राजा, उंबरखेड, जवळखेड रस्त्याचे रुंदीकरणसह सुधारणा करणे, २ कोटी ६० लाख रूपये अमडापूर, लव्हाळा, दुसरबीड, राहेरी वर्दडी रस्त्याची सुधारणा करणे, ५ कोटी रूपये धोडप, पेठ, एकलारा, अंबाशी, मेरा बु., सावखेड नागरे रस्याची सुधारणा करणे या कामांचा समावेश आहे. लवकरच कामवरील स्थगिती उठून ही कामे देखील मार्गी लागणार आहेत.