खळबळ उडवून दिल्यानंतर डॉ.राजेंद्र शिगणेंचा फोन बंद! चार्जिंग संपली की दुसरच काहीतरी? सिंदखेडराजा मतदारसंघातील महायुतीच्या इच्छुक उमेदवारांना गुदगुल्या....

 
Shingne
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वर्धा येथे आज झालेल्या एका कार्यक्रमात डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी एक विधान करून खळबळ उडवून दिली. "नाईलाजाने मी अजितदादांसोबत गेलो, शरद पवारांचे नेतृत्व देशाला आणि राज्याला आश्वासक आहे." असे विधान आमदार डॉ.शिंगणे यांनी केले. त्यामुळे आ.डॉ.शिंगणे आता शरद पवार गेलेत की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान यासंदर्भात खुलासा करण्यासाठी "बुलडाणा लाइव्ह" ने डॉ.शिंगणे यांना संपर्क साधला असता त्यांचा फोन बंद येत आहे. डॉ.शिंगणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांचा फोन स्विच ऑफ झाला असेल असे सांगण्यात आले.
  आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या एका विधानामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या विधानाने सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाची गणिते बदलण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाकडून निवडणुकीची तयारी करीत असलेल्या डॉ.गायत्री शिंगणे यांच्यासाठी देखील हा धक्का मानला जात आहे..शिवाय डॉ.शिंगणे शरद पवार गटात जात असतील तर महायुतीकडून इच्छुक उमेदवारांना गुदगुल्या देखील झाल्या असतील असे मजेशीर चित्र आहे.