कमिशनखोरीसाठी जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कारभार सुधरा, अन्यथा खुर्चीत बसु देणार नाही! काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंचा चिखली नगरपालिका प्रशासनाला इशारा!
चिखलीत काँग्रेसचे डफडे बजाव आंदोलन गाजले; टेंडर वरून केले सवाल; म्हणाले, आधी जी कामे लाखात होत होती त्यासाठी आता कोट्यवधी रुपये कसे लागतात?
Dec 2, 2023, 10:40 IST
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
सुमारे दोन वर्षापासुन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यामुळे प्रशासकीय कार्यकाळ असलेल्या चिखली नगर परिषद प्रशासनाचे नागरी समस्यांकडे प्रचंड दुर्लक्ष होत आहे. परिणामी विविध ज्वलंत नागरी समस्यांच्या विळख्यात सर्वसामान्य नागरीक अडकला आहे. शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्याने डेंगु हिवताप इत्यादी रोगांनी थैमान घातले आहे. शहराला होणारा पिवळया रंगाच्या व दुषीत पाणीपुरवठयामुळे नागरीक हवालदिल झाले आहेत. चिखलीकरांना मुलभूत सुविधा पुरविण्यास अकार्यक्षम ठरत असलेल्या नगर परिषदेत मनमानी, भ्रष्टचारी व गलथान कारभाराने कळस गाठला आहे असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केला. झोपेचे सोंग घेणा-या नगर परिषदेला जागे करण्याकरीता काँग्रेस व महाविकास आघाडीचा विराट डफडे बजाओ मोर्चा नगर परिषदेवर धडकला. मुख्याधिकारी व नगर परिषद प्रशासनाने येत्या काळात आपल्या कार्यपध्दतीत बदल करून कारभार सुधरावा तसेच कमिशनखोरीमुळे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये अन्यथा खुर्चीत बसु देणार नसल्याचा झणझणीत इशाराही यावेळी राहुल बोंद्रे यांनी न.प. प्रशासनाला दिला.
या मोर्चात कॉग्रेसह महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, शिवसेना उबाठा संपर्क प्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर, या प्रमुख नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते तथा नागरीक व महिलांची मोठया संख्येने उपस्थिती होती. निवेदन स्विकारण्यास नगर परिषदेचे प्रशासक अनुपस्थित राहिले त्यामुळे आंदोलनकर्ते सतंप्त झाले होते हे येथे उल्लेखणीय.
चिखली शहरातील डि.पी.रोड वरील हिंदुसुर्य महाराणा प्रताप यांना वंदन करून या विराट मोर्चाला जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात सुरूवात करण्यात आली. महाविकास आघाडीच्या वतीने गलथान, भ्रष्टाचार,मनमानी कारभाराचा कळस गाठणा-या न.प.प्रशासना विरूध्द आंदोलन करण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून महापुरूषांच्या पुतळयांना अभिवादन करून हा मोर्चा नगर परिषदेवर धडकला. यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी आपल्या दालनातुन गैरहजर असल्याने आंदोलन कर्त्यांच्या सतंप्त प्रतिक्रीया उमटत होत्या.
टेंडर वरून सवाल....
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना राहुल बोंद्रे म्हणाले की, निवडणुका लांबणीवर पडल्याने प्रशासकाच्या माध्यमातुन सत्ताधिकारी, लोकप्रतिनधी, नगर परिषेदेचा कारभार करत आहे. शहरात डेंगु आजाराने थैमान घातले असुन सर्वच दवाखाने हाउसफुल झाले आहे, न.प.प्रशासकीय कार्यभारावर कुणाचाच अंकुश उरला नाही, सर्वत्र अस्वच्छता पसरली, नाल्या तुंडूब भरल्यात, रस्त्याची साफसफाई होत नाही, अनेक पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पाहवयास मिळते, यापूर्वी लाखो रूपयात होणाऱ्या साफसफाईचे टेंडर सुमारे २ कोटी ८० लाखाच्या घरात कसे पोहचले ? नगर परिषदेत प्रचंड भ्रष्टाचार माजला असुन सफाईचे टेंडर घेणाऱ्या ठेकेदाराने स्वतःचे मजुर व गाडया लावायला पाहीजेत, मात्र ठेकेदाराच्या नावाखाली सत्ताधा-यांच्या जवळचेच ठेकेदारी करतात, पुर्वी ५०-६० लाखात होणा-या रस्त्यांचे टेंडर कोटयावधीच्या घरात, तर ४-५ लाखात निर्माण होणा-या कमानींचे तर ३०-४५ लाखा पर्यंत अव्वाच्या सव्वा बिले काढण्याचा विक्रमी भ्रष्टाचार नगर परिषदेत माजला असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. मुख्याधिकारी पुर्णवेळ हजर का राहत नाही हा यक्ष प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. शहराला सतत पिवळया रंगाचा पाणीपुरवठा करण्यात येतो, येत्या काळात नागरीकांच्या आरोग्याशी खेळणा-या मुख्याधिकारी व न.प.प्रशासनाने प्रशासकीय कामकाजाचा दर्जा सुधारला नाही तर कुणालाही खुर्चीत स्वस्थ बसु देणार नाही असा इशाराही यावेळी राहुल बोंद्रे यांनी दिला.
यावेळी कुणाल बोंद्रे, अतहरोद्यीन काझी, रवि तोडकर, श्रीराम झोरे, दिपक देशमाने, डॉ.मोहमंद इसरार, रिक्की काकडे, नंदु सवडतकर, ज्ञानेश्र्वर सुरूशे, निलेश अंजनकर, अशोकराव पडघान, सौ. ज्योतीताई पडघान, दिपक खरात, राउफ हाजी, गोकुळ शिंगणे, दिपक थोरात, विजय गाडेकर, गोकुळ शिंगणे , राजु रज्जाक, गोपाल देव्हडे, बंडु कुळकर्णी, श्रीकृष्ण धोंडगे, कपील खेडेकर, नंदु क-हाडे, संतोष वाकडे, प्रलय खरात, प्रितम गैची, विश्वासराव खंडागळे, शाम शिंगणे, विलास सुरडकर, डॉ. ज्योतीताई खेडेकर, दिपक म्हस्के, संजय गाडेकर, सदानंद मोरगंजे, बालुबाई जैवाल, प्रमोद चिंचोले, रत्नाताई सोळंकी, गोलु पवार, तुकाराम सोळंकी, कशोर कदम, साहेबराव डुकरे, प्रदिप पचेरवाल, शिवराज पाटील, राहुल सवडतकर, शहेजाद अल्ली खान, प्रशांत देशमुख, डिगांबर देशमाने, मनोज जाधव,खलील बागवान, बिदुसिंग इंगळे, पप्पु पाटील, प्रकाश सपकाळ, विजय जागृत, डॉ. अमोल लहाने, रमजान चौधरी, डॉ. घुगे, मोहीत घुगे, राजेश खरात, विलास कंटूले, सचिन शेटे, नासेर सौदागर, पवन गवारे, रामधन मोरे, सुनिल पवार, रोहन पाटील, बबलु शेख, अमीनखॉ उस्मानखॉ, गयास बागवान यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध सेल व विभागाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,नागरीक, महिलांची उपस्थिती होती.