बांधावर जाऊन फोटोसेशन करू नका, कोरडी सहानुभूती दाखवू नका, सत्तेत आहात तर मदत घेऊन या.. तुपकरांचा विरोधकांना चिमटा!

 
सोमठाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):बांधावर जाऊन फोटोसेशन करू नका, कोरडी सहानुभूती दाखवू नका, सत्तेत आहात तर मदत घेऊन या असा खोचक टोला, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी नाव न घेता लोकप्रतिनिधिंना लगावला. निवडक माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 
काल रात्रीपासून जिल्हात अचानक अतिवृष्टी झाल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. तर आज सकापासूनच लोकप्रतिनधींकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत आहे. एकीकडे शेतकरी नेते रविकांत तूपकर यांचे सोयाबीन कापूस प्रश्नी चिखली तालुक्यातील सोमठाणा येथे अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. २९ नोव्हेबरला मंत्रालय ताब्यात घेण्याच्या ईशाऱ्यावर तुपकर ठाम आहे. दरम्यान आज माध्यमांशी बोलतांना विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले, आंदोलनात शेतकऱ्यांचा विविध मागण्या आम्ही मांडल्या आहेत. यासोबतच काल अचानक झालेल्या, अतिवष्टीमुळे नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणीही आता या आंदोलनात जोडण्यात येत असल्याचे ते म्हणाले.सत्ताधाऱ्यांनी कोरडी सहानुभूती दाखवू नये, सत्तेत आहात तर मदत घेवून या असेही तुपकर सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाले.