झालं..! चिखलीची कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीच्या ताब्यात; भाजपच्या पॅनलला केवळ १ जागा

 
hfh
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यंदा टाईट होईल असे सर्वांना वाटत होते. मात्र तसे झाले नाही. माजी आमदार राहुल बोंद्रेचा सहकारातील करिश्मा कायम राहिला. बळीराजा पॅनलला  १७ जागा मिळाल्या तर भाजपच्या सहकार परिवर्तन पॅनलला १ जागा मिळाली.

हमाल मापारी मतदार संघातील जागा वगळता इतर सर्वच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातील चारही जागा, व्यापारी अडते मतदारसंघातील २ जागा,  सहकारी सोसायटी मतदारसंघातील अकराही जागा महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार धृपदराव सावळे यांच्या भावाचाही पराभव झाला आहे. विजयानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केलाय.