जिल्हा काँग्रेसची बुलढाण्यात निदर्शने, खाती गोठवून कोट्यवधींचा दंड आकारल्याचा केला निषेध!

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची बँक खाती गोठवून तब्बल १८०० रुपयांचा दंड ठोठावण्याच्या मनमानी कारवाईचा काँग्रेसतर्फे आज तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या निषेधाच्या घोषनांनी जयस्तंभ चौक परिसर दणाणला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी भवन समोरील मार्गावर आज रविवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार व संबंधित यंत्रणांचा निषेध करणाऱ्या घोषणा दिल्या. ही कारवाई मनमानी, लोकशाही विरोधी व विरोधकांची मुस्कटदाबी करणारी असल्याची टिका नेत्यांनी यावेळी बोलताना केली.
 आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष मंगला पाटील, जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम नाईक, ज्येष्ठ नेते लक्ष्मण घुमरे, संतोष आंबेकर, गजानन मामलकर, प्रकाश पाटील, दत्ता काकस, दीपक काटोले, सुनील पनपालिया, झाकीर कुरेशी आदी पदाधिकारी बहुसंख्येने सहभागी झाले.